अॅपलाचियन्स : यूएस राज्याच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पावसामुळे पूर आल्याने केंटकीच्या अॅपलाचियन्समध्ये किमान १६ लोकांचा मृत्यू झाला.
त्याचवेळी इतर लोकांना बोटीद्वारे पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. केंटकीच्या गव्हर्नरने सांगितले की, पुरातील सर्व बळी शोधण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. या पुरात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला.
कारण, मुसळधार पावसामुळे अॅपलाचिया शहर जलमय झाले असून येत्या काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अनेक ठिकाणी बचावकार्यासाठी बचाव पथकाला मोठा संघर्ष करावा लागत आहे.