29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी झेंडे

अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी झेंडे

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थक लोकांनी पुन्हा एकदा कृषि कायद्यांच्या विरोधाचा आसरा घेत भारतीय दुतावासाच्या बाहेर आंदोलन केले. खलिस्तान समर्थकांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारत सरकारद्वारे भारतात लागू केलेल्या तीन कृषि कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली. ही मागणी करताना आंदोलकांनी हातात खलिस्तानचे झेंडे घेतले होते. याआधी देखील भारतीय दुतावासासमोर याप्रकारची आंदोलने झाली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आंदोलकांनी दुतावासाबाहेर खलिस्तानचे झेंडे फडकावत महात्मा गांधींची प्रतिमा मलिन केली होती.

कृषि कायद्यांवरुन गेल्या पाच महिन्यांपासून देशात असंतोष आहे. हे कायदे काळे असून ते रद्दच केले जावेत, या मागणीसह जवळपास ६२ दिवसांपासून प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आपल्या मागण्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकºयांकडून ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले. मात्र, या परेडमध्ये गोंधळ झालेला पहायला मिळाला. काही ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांच्या दरम्यान संघर्षाचे वातावरण पहायला मिळाले. काही आंदोलकांनी ठिकठिकाणी हिंसा केली तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा देखील फडकावला.

उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या