27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोव्हिशिल्डच कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार

कोव्हिशिल्डच कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या स्टडी रिपोर्टमुळे जगासह भारताला मोठा दिलासा मिळाला असून, ऑक्सफोर्डची अ‍ॅस्ट्राजेनेका म्हणजे कोव्हिशील्ड लसीपासून बनणारी अँन्टिबॉडी केवळ कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून लढण्यास सक्षम आहे त्याचसोबत कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यात प्रभावी ठरत आहे. भारताच्या दृष्टीकोनातून या रिपोर्टला विशेष महत्त्व आहे. कारण देशात कोव्हिशील्ड लसीचा सर्वाधिक वापर करण्यात आला असल्याने चिंता कमी झाली आहे़

जगभरात पुन्हा वाढणा-या कोरोना संक्रमणामुळे सुरक्षित राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे असे तज्ज्ञ आवाहन करत आहेत. अलीकडच्या रिपोर्टमध्ये कोरोनाचा नवा डेल्टा आणि लम्बाडा व्हेरिएंट अँन्टिबॉडिजलाही चकमा देत असल्याचे म्हटले आहे़ अशावेळी लोकांच्या मनात नेमकी कुठली लस सुरक्षा देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता एका शोधाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी सांगितल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, कोव्हिशील्ड लसीपासून बनलेली अँन्टिबॉडी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला सहजपणे नष्ट करते. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका आणि जॉनसन अँन्ड जॉनसनसारख्या अ‍ॅडेनोवायरस लस शरीरात अशाप्रकारे काम करते ज्याने खूप काळ अँन्टिबॉडी तयार होण्यास मदत मिळते. टी पेशींची निर्मिती आयुष्यभर होऊ शकते. त्याच आधारे कोविशील्ड आणि जॉनसन अँन्ड जॉनसन लस आयुष्यभर सुरक्षित असल्याचे मानले जात आहे.

टी पेशींची निर्मिती होतेय
प्रोफेसर बुकहार्ड लुडविंग म्हणाले की, स्टडी करताना टी पेशींची निर्मिती प्रभावी होत असल्याचे आढळले. त्यामुळे कोरोनाच्या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. या पेशींना फाइब्रोब्लास्टिक रेटिकुलर सेलही म्हणतात. संक्रमित व्हायरसला शोधून त्याला नष्ट करण्याचे काम टी-पेशी करतात. त्यामुळे संक्रमण संपूर्ण शरीरात पसरत नाही.

दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती विकसित
आधीच्या अभ्यासानुसार वैज्ञानिकांनी असा दावा केला होता की, एमआरएनए फायझर लस आणि मॉडर्नापेक्षा टी-सेल्स तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लस अधिक प्रभावी असू शकते. ऑक्सफोर्डच्या औषध विभागातील न्युफिल्ड विभागातील प्रोफेसर पॉल क्लेनर्मन म्हणतात की, जगभरातील कोट्यवधी लोकांना एडेनोव्हायरसवर लस देण्यात आली आहे.

डेल्टावर लसीचा ७४ टक्केपर्यंत प्रभाव
जगातील मोठी लोकसंख्या कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करू शकते असे या अभ्यासाच्या आधारे म्हणता येईल. जगभरात सध्या चिंता बनलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरोधातही कोव्हिशील्ड लस प्रभावी होण्याचा दावा आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, या लसीचे दोन्ही डोस ९२ टक्के संरक्षण देते. कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर या लसीचा प्रभाव अनुक्रमे ७४ आणि ६४ टक्के असू शकतो.

सीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या