22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयके.पी.शर्मा ओलींची पक्षातूनच हकालपट्टी

के.पी.शर्मा ओलींची पक्षातूनच हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

काठमांडू: नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील शाखेने पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओली यांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे. माधव नेपाळ यांची पक्षाचे दुसरे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील शाखेने १५ जानेवारी रोजी ओली यांच्याकडून पक्षाच्या धोरणाविरुद्ध पावले उचलल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. त्यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. संसद बरखास्त करणे घटनाबा असल्याचा आरोप करून कम्युनिस्ट पक्षाच्या या शाखेने सरकारविरुद्ध मोठी रॅली काढली होती. देशाच्या संघराज्य प्रजासत्ताकाला त्यामुळे धोका पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला. संसद बरखास्त करून ओली यांनी घटनेलाच धक्का लावल्याचा आरोप प्रचंड यांनी केला होता. माधव नेपाळ यांनीही घटनेने पंतप्रधानांना संसद बरखास्त करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचा ओलींना दिलासा
नेपाळच्या निवडणूक आयोगाने पंतप्रधान ओली यांना दिलासा देताना प्रचंड यांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना अधिकृत मान्यता देण्यास नकार दिला असून एकसंध कम्युनिस्ट पक्षाची मान्यता कायम ठेवली आहे. त्याशिवाय ओली यांच्यावरील कारवाईदेखील अमान्य केली आहे.

लॉकडाऊनमध्ये देशातील मुठभर अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या