लंडन : ललित मोदींनी सुष्मिता बरोबरचा तो फोटो व्हायरल केला आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आले. त्यांनी सुष्मिताला आपलं बेटर हाफ म्हटलं. आम्ही सध्या एकमेकांना डेट करत असून लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले. या पाठोपाठ नेटक-यांनी तर सुष्मिता आणि ललित मोदींच्या प्रॉपर्टीची चर्चा सुरु केली आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी दोघांच्या वयातील अंतर शोधले, काहींनी त्यांच्या एकुण संपत्तीचा शोध घेतला. ललित मोदी हे सध्या लंडनमध्ये आहेत. मोदी एंटरप्रायजेस ही हेल्थ, फॅशन, फुड यासारख्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ती भारत वगळता पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करते.
ललित मोदींच्याकडे एकुण ४ हजार ५५५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. लंडनमध्ये त्यांचं मोठं घर आहे. सुश्मिताच्या बाबत सांगायचे झाल्यास, तिच्याकडे ७४ कोटींची प्रॉपर्टी आहे. ती महिन्याला ६० लाख रुपये तर वर्षाला ९ कोटी रुपयांची कमाई करते. गेल्या वर्षी सुष्मिताच्या आर्या नावाच्या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुष्मिता ही एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये घेते. तर जाहिरातींमधून दीड कोटी रुपये कमावते.