31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home आंतरराष्ट्रीय त्या सैनिकाला सोडा - चीनची मागणी

त्या सैनिकाला सोडा – चीनची मागणी

एकमत ऑनलाईन

लेह : पूर्व लडाखमधील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग हिल भागात एका चिनी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराचा हा जवान शनिवारी भारतीय हद्दीत शिरला होता. या सैनिकाला तात्काळ सोडण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे. अंधार असल्याने तो सैनिक रस्ता चुकला, असे चीनकडून सांगण्यात आले आहे.

पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात शनिवारी भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले होते़ चिनी लष्कराचा हा जवान भारतीय हद्दीत आला होता, त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते़ या सैनिकाला परत देण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे.

रात्रीच्या अंधारात आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा जवान भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्यानंतर याची माहिती भारतीय लष्कारालाही देण्यात आली होती. जेणेकरून भारताकडून त्याला शोधण्यासाठी मदत होईल, असे चिनी लष्कराच्या एका ऑनलाईन साईटवर ही माहिती देण्यात आली आहे. दोन तासानंतर भारतीय लष्कराच्या बाजूने प्रतिसाद देण्यात आला. बेपत्ता असलेला सैनिक भारतीय लष्कराला मिळाल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे. लवकरच हा सैनिक चीनकडे परत केला जाणार असल्याचे या साईटवरून चिनी लष्कराने म्हटले होते़

 

औशाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एसटी पलटी होवून एकाचा मृत्यू, 13 प्रवासी जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या