25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणात कायदेशीर अडचणी

मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणात कायदेशीर अडचणी

एकमत ऑनलाईन

लंडन: वृत्तसंस्था
भारतातल्या १७ बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाला वेळ लागू शकतो. कारण त्याच्या प्रत्यार्पणाच्या मार्गात एक कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे़ जी सोडवल्याशिवाय मल्ल्याला भारतात आणणे शक्य होणार नाही. ही कायदेशीर अडचण सोडवल्यानंतरच विजय मल्ल्याला भारतात आणता येणं शक्य आहे. भारताला ब्रिटिश उच्चायोगाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. ही अडचण नेमकी काय आहे हे मात्र गोपनीय असल्याचं ब्रिटिश उच्चायोगाने म्हटलं आहे.

किती कालावधी लागेल सांगता येणार नाही: ब्रिटिश उच्चायोग
कायद्यानुसार एक कायदेशीर अडचण सोडवल्याशिवाय भारतात विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य नाही. ही कायदेशीर अडचण काय आहे? ते गोपनीय ठेवण्यात आलं आहे. ही अडचण सोडवली गेल्याशिवाय विजय मल्ल्याला भारतात पाठवले जाणार नाही. ही अडचण सोडवण्यास नेमका किती कालावधी लागेल हे इतक्यात सांगता येणार नसल्याचेही ब्रिटिश उच्चायोगाने सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Read More  जागतिक सायकल दिनी म्हणजे ३ जून रोजी कफल्लक

यू के येथील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र आता एक कायदेशीर अडचण असल्याचे ब्रिटिश उच्चायोगाने म्हटलं आहे. विजय मल्ल्याला लिकर ंिकग ही उपाधीही लावण्यात आली होती. तसंच बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या