22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये २६ शहरांत लॉकडाऊन

चीनमध्ये २६ शहरांत लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

शांघाय : चीनमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढत असून तो रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु चीनला या महामारीतून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण लागू केले आहे.
हे धोरण कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी असले तरी आता ते चिनी नागरिकांसाठी क्रूरतेचे शस्त्र बनत आहे. त्यामुळे नागरिकांना आता कोरोनाची नाही तर लॉकडाऊनची भीती वाटत आहे.
अशा परिस्थितीतही चीनमध्ये आत्तापर्यंत २६ शहरे लॉकडाऊन करण्यात आली असून सुमारे २१ कोटी नागरिकांना घरात बंदिस्त रहावे लागत आहे. दरम्यान चीनमधील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली जात आहे. यामुळे चीनच्या सात दशकांच्या इतिहासात प्रथमच १ मे हा कामगार दिनाचा कार्यक्रम साजरा होऊ शकला नाही.

दोन महिने शाळा बंद
चीनमधील झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतात तब्बल दोन महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या प्रांतामध्ये ओमिक्रॉन रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान जिनपिंग सरकारने या प्रांतातील प्राथमिक शाळांमधील मुलांच्या कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या मुलांच्या घरी जाऊन आता टेस्ट केल्या जात आहेत.

दरम्यान चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये कडक लॉकडाऊन असतानाही बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत. दरम्यान चीनमधील अनेक शहरांत लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. त्यामुळे जिनपिंग यांनी सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचा-यांना मदतकार्यात सहभागी केले असून त्यानुसार नागरिकांना अन्नधान्य वितरित केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या