30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home आंतरराष्ट्रीय खेचरांवरुन सीमेवर पुरवली जातेय रसद

खेचरांवरुन सीमेवर पुरवली जातेय रसद

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चिनी प्रसारमाध्यमांकडून अनेकदा चिनी लष्कराकडे आधुनिक तंत्रज्ञान असून बाकी देशांच्या तुलनेत चिनी लष्कर अधिक अत्याधुनिक असल्याचे दावे केले जातात. चिनी सरकारच्या मालकीच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानेही काही आठवड्यांपूर्वी आपल्या एका लेखामध्ये यासंदर्भातील दावा केला होता. यामध्ये लडाखच्या सीमेवर चिनी सैन्याला अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने अत्यावश्यक सेवा पोहचवली जात असल्याचे म्हटले होते. मात्र आता काही दिवसांपूर्वी याच ग्लोबल टाइम्सने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चिनी लष्कर चक्क खेच-यांच्या पाठीवरुन सीमेवर सामान नेताना दिसत आहे.

भारत आणि चीनदरम्यान सध्या लडाखच्या सीमेजवळ सुरु असणा-या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने सीमा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांनी काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून सैनिकांना शस्त्र आणि खाण्याच्या गोष्टी पुरवल्या जात असल्याचे व्हीडीओ पोस्ट केले होते. ग्लोबल टाइम्सनेही यासंदर्भातील वृत्तांकन केले होते़ मात्र सध्याची परिस्थिती अगदीच वेगळी असल्याचे चित्र दिसत आहे. चिनी सेना सध्या तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ असणा-या लष्करी जवानांना घोडे आणि खेच-यांच्या मदतीने सामान पोहचवत आहे. लष्कराला पाठवण्यात येणारी रसद ही प्राण्यांच्या पाठीवरुन पुरवली जात असल्याचे सांगत ग्लोबल टाइम्सनेच यासंदर्भातील वृत्तांकन केले आहे़

ग्लोबल टाइम्सच्या ताज्या लेखामध्ये चिनी लष्कर तिबेटमधील भारतीय सिमांजवळ अधिक उंचावर, कठीण परिस्थितीमध्ये सामान पोहचवण्यासाठी व्यवहारिक दृष्टीकोनातून खेचरें आणि घोड्यांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. नैऋत्य चीनमध्ये तिबेटमधील रुतोंग काऊंटी परिसरामध्ये तिबेटी मिलिशिया सैनिकांना रसद पुरवण्यासाठी चीनचे लष्कर म्हणजेच पीपल्स लिब्रेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक काम करत आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचाच भाग असणा-या रुतोंग काउंटी पार्टीबरोबरच सरकारने चिनी सैनिकांना वाटेल ते झाले तरी सीमेवरील जवानांना सामान आणि दारु गोळा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात अमेरिकेच्या टेस्ला कंपनीचा प्रकल्प सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या