22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सचा संप

लुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सचा संप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम उड्डाणांवर झाला आहे. लुफ्थांसा एअरलाईन्सची ८०० उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यामुळे सुमारे १,३०,००० प्रवाशांची अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर दिल्ली विमानतळावर ७०० प्रवाशी अडकले आहेत. रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये दिल्लीहून फ्रँकफर्ट आणि म्युनिक या दोन फ्लाइटचा समावेश आहे. उड्डाण रद्द केल्यामुळे ७०० प्रवासी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर अडकले. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी विमानतळावर गोंधळ घातला.

शुक्रवारी जर्मनीतील लुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सनी संप पुकारला. यामुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली. मुख्य म्हणजे फ्रँकफर्ट आणि म्युनिक येथून सुटणा-या फ्लाईट्सच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला. अनेक जर्मन राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आहेत, त्यामुळे या संपामुळे अनेक प्रवाशाची गैरसोय होत आहे. दरम्यान लुफ्थांसाच्या उपकंपन्या स्विस, ऑस्ट्रियन, ब्रुसेल्स आणि युरोविंग्ज या संपामुळे प्रभावित होणार नाहीती. कंपनीने सांगितले की, उपकंपन्यांच्या वेळापत्रक कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यांची उड्डाणे नियोजित वेळापत्रकानुसार चालवली जातील. जर विमान आणि कर्मचारी आधीच परदेशात असतील तर, जर्मनीच्या बाहेरून निघणारी उड्डाणे नियोजित वेळेनुसार चालवली जातील.

संतप्त प्रवाशांचा गोंधळ
वैमानिकांच्या संपामुळे अनेक उड्डाण रद्द झाली. त्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये दिल्लीहून फ्रँकफर्ट आणि म्युनिक या दोन फ्लाइटचा समावेश असल्याने दिल्ली विमानतळावर ७०० प्रवासी अडकले होते. यावेळी प्रवाशांनी गोंधळ घातला. प्रवाशांनी कंपनीला पर्यायी फ्लाईट उपलब्ध करण्याची किंवा तिकीटाचे पैसे परत करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या