23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय कलाकारांनी साकारले महाराणीचे भित्तीचित्र

भारतीय कलाकारांनी साकारले महाराणीचे भित्तीचित्र

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतीय कलाकारांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे भित्तीचित्र साकारत त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. जिग्नेश आणि यश पटेल अशी या कलाकारांची नावे आहेत. ब्रिटनमधील हाउन्सलो येथील किंग्जले मार्गावरील एका दुमजली इमारतीवर राणीचे भित्तीचित्र साकारले जात आहे.

ब्रिटनमधील भारतीय समुदाय या उपक्रमासाठी ‘गो फंड मी’च्या माध्यमातून ऑनलाइन निधी संकलन करत आहे. आत्तापर्यंत सुमारे एक हजार पौंड निधी जमा झाला आहे. या भव्यदिव्य भित्तीचित्र निर्मितीच्या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचे आणि प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याचे कलाकारांनी सांगितले. हाउन्सलो परिसरात साकारण्यात येत असलेले भित्तीचित्र भव्य असून ते दुरूनही दिसणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या