32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय मलालाला पुन्हा मिळाली धमकी

मलालाला पुन्हा मिळाली धमकी

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझाईला पुन्हा एकआ अतिरेक्यांनी गोळया घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे. न वर्षांपुर्वी ज्याने तिच्यावर गोळीबार केला होता, त्या एहसानुल्ला एहसान यानेच ही धमकी गुरुवारी ट्विटरवरुन दिली. एहसान हा तेहरीके-तालिबानचा सदस्य असून त्याने दिलेल्या धमकीत मागच्यावेळी काही चुका झाल्या, पण पुढच्यावेळी काही चूक होणार नाही असा इशाराही दिला आहे. दरम्यान ट्विटरने त्वरीत त्याचे अकाऊंट बंद केले आहे.

दरम्यान मलालाने यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान व पाकिस्तानी सेना यांना ट्विटरवरुन जाब विचारला आहे. आपल्यावर गोळीबार करणारा एहसान सरकारच्या तावडीतून सुटलाच कसा असा सवालच तिने विचारला आहे. दुसरीकडे इम्रान खान यांचे सल्ला गार राऊफ हसन यांनी धमकीची सरकार चौकशी सरकार करत आहे, असे सांगितले आहे.

एहसानला गुप्तचर यंत्रणांचे सहाय्य
एहसानला २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु जानेवारी २०२० मध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या सेफ हाऊसमधून तो पळून गेला होता. त्याच्या सुटकेनंतर एहसानची मुलाखत घेण्यात आली होती. आणि ट्विटर अकाऊंटद्वारे त्याने पाकिस्तानी पत्रकारांशी संवादसुध्दा साधला होता. त्याच्याकडे एकापेक्षा जास्त ट्विटर अकाउंट आहेत, त्या सर्वांना निलंबित केले आहे.

जीम कॉर्बेटमधील खासगीकरणावरुन केंद्र सरकारला नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या