29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeआंतरराष्ट्रीयढाका येथे भीषण स्फोट; सात ठार, ७० हून अधिक जखमी

ढाका येथे भीषण स्फोट; सात ठार, ७० हून अधिक जखमी

एकमत ऑनलाईन

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे मंगळवारी भीषण स्फोट झालाय. या स्फोटात जवळपास १५ जण ठार झाले असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका इमारतीत झाला आहे. घटनेनंतर या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या अपघातातली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी रशीद बिन खालिद यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या अकरा तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत. स्फोट झालेली इमारत पाच मजली असून त्यातील तळमजल्यावर एक सॅनिटरी दुकान आहे. शिवाय एका बँकेचे कार्यालय देखील आहे.

या स्फोटामुळे बँकेचे कार्यालय आणि दुकानाला आग लागली आहे. बीआरटीसी बस काउंटरजवळ दुपारी ४.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला. ऊटउऌ पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक बच्चू मिया यांनी सांगितले की, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढले असून ७० हून अधिक जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण लगेच समजू शकले नाही.

पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जखमींवर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत. त्याच्या शेजारी बँकेची शाखाही आहे. स्फोटामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या