26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकाबुल विद्यापीठ हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक

काबुल विद्यापीठ हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक

एकमत ऑनलाईन

काबुल : काही दिवसांपूर्वी काबुल विद्यापिठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मास्टर माईंडला अफगाणिस्तानच्या फौजांनी अटक केली आहे. अफगाणिस्तानचे प्रथम उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.

अफगाण फौजांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अदिल असे असून, तो पंजशीर प्रांतातील रहिवासी आहे. त्याने तीन वर्षे शरीया कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर हक्कानी नेटवर्कचा सदस्य असलेल्या सनाउल्लाहने अदिलला दहशतवादी गटामध्ये भरती करून घेतले होते. अफगाणिस्तान सरकारार दबाव आणू शकणा-या कारवाया करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली गेली होती, असे या संशयिताने कबूल केले आहे. काबुल विद्यापिठावरील हल्ल्यासाठी खोस्त प्रांतातून हक्कानी नेटवर्ककडून शस्त्रे मिळाल्याचेही त्याने कबुल केले आहे.

काबुल विद्यापिठावर प्रत्यक्ष हल्ला करणा-या प्रत्येक हल्लेखोराला एकापेक्षा अधिक नावांनी ओळखले जात होते. हिज्ब-उल-तहरीर, तालिबान अथवा दाईश यासारख्या संघटनांशीही त्यांचे संबंध असायचे, असेही उपाध्यक्ष सालेह यांनी सांगितले.

‘रॉ’ ने ७०० दहशतवादी तयार केले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या