22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमेरे मन को भायाऽऽऽऽऽ चीनमध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचा डॉग मीट फेस्टिव्हल सुरू

मेरे मन को भायाऽऽऽऽऽ चीनमध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचा डॉग मीट फेस्टिव्हल सुरू

एकमत ऑनलाईन

वुहान : चीनच्या वुहानमधून संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. वुहानमधील मीट मार्केटमधून हा व्हायरस पसरल्याने हे मार्कटही बंद करण्यात आले होते. असे असले तरी आता चीनमध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचा डॉग मीट फेस्टिव्हल सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कुत्र्याच्या मांसावरही चीनने बंदी आणली होती.

इतर प्राण्यांच्या मांसासह कुत्र्यांचे मांसही आवडीने खाल्ले जाते

चीनमध्ये इतर प्राण्यांच्या मांसासह कुत्र्यांचे मांसही आवडीने खाल्ले जाते. आज पासून चीनमध्ये डॉग मीट फेस्टिव्हल सुरू झाला आहे. या या उत्सवात कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. चीनच्या परंपरेनुसार याया संबंध अध्यात्मिक शक्ती आणि देवाशी नाते जोडण्यावर आहे.

जिवंत कुत्रा घरी घेऊन त्याचे मांस शिजवतात

कुत्र्याचे मांस खाल्ल्याने आत्मा आणि शरीर तंदुरुस्त राहतं असे चीनमध्ये समज आहे. चीनमध्ये कुत्र्याच्या मांसपासून वेगवेगळ्या डिशेस बनवल्या जातात. त्यात लिची, दारूही मिसळली जाते. अनेक लोक जिवंत कुत्रा घरी घेऊन त्याचे मांस शिजवतात आणि हा उत्सव साजरा करतात.

कुत्र्यांशी अशाप्रकारे हिंसक वागत असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जगातून शी थू

कुत्रा हा मनुष्याचा मित्र समजला जातो. पण चीन कुत्र्यांशी अशाप्रकारे हिंसक वागत असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जगातून शी थू होत असते. अनेक प्राणीमित्र संघटनांनी हा उत्सव रद्द करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण केला होता.कोरोना संकटामुळे चीनने कुत्र्याच्या मांसावर बंदी घातली होती. कुत्रा फक्त पाळण्यासाठी किंवा विकण्याची परवानगी सरकारने दिली होती. त्यानुसार कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून गणला जात होता. असे असली तरी अनेक चायनीज नागरिकांनी या कायद्याला केराची टोपली दाखवली आहे. चीनच्या युलिन शहरात कुत्र्यांचा बाजार सजला आहे आणि अनेक खवय्ये इथे आले असून कुत्र्यांचे मांस खाण्यास ते उत्सुक आहेत.

Read More  तपासाला सुरुवात करावी, म्हणजे सत्य समोर येईल- अरविंदा डिसिल्वा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या