21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसॅनिटायझरमधील मिथेनॉलचा जिवास धोका!

सॅनिटायझरमधील मिथेनॉलचा जिवास धोका!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. करोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. हॅण्ड सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे १५ जणांना त्रास झाला. त्यातील चौघे मृ्त्यूमुखी पडले असून, तिघांना अंधत्व आले आहे. हॅण्ड सॅनिटायझरमधील मिथेनॉल घटकामुळे ही जीवितहानी झाली असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या आजारावर मात करणा-या रुग्णांना इतर आजार होण्याचा धोका संभावत असल्याचा इशारा याधीच देण्यात आला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मुखत: जगभरात होत आहे़ त्यातच आता चीनमध्ये कोरोना संसर्गावर मात केलेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये कोरोना संसर्गाचे मुख्य केंद्र राहिलेल्या वुहान शहरातील एका रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. वुहान विद्यापीठाच्या झोंगनन रुग्णालयाचे संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वात एक पथक एप्रिल महिन्यापासूनच करोनावर मात केलेल्या १०० रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहे.

शरिराचे होतेय मोठे नुकसान
अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरच्या वापरामुळे कोरोनाच्या विषाणूला दूर ठेवता येत असल्याचे म्हटले जाते. मान्यताप्राप्त हॅण्ड सॅनिटायझरमध्ये विषाणूंचा खात्मा करण्यासाठी मुख्यत: इथाइल अल्कोहोल असतो. हे अल्कोहोल पोटात गेल्यास शरिराचे मोठे नुकसान होत नसल्याचे म्हटले जाते. मात्र, काही कंपन्यांकडून इथाइल अल्कोहोलऐवजी विषारी मिथेनॉलचा वापर करत आहेत. त्यामुळे मानवाच्या शरीराला अपाय होत असल्याचेही समोर आले आहे.

सॅनिटायझरमुळे होणा-या दुष्परिणामाचे लक्षणे
आरोग्य अधिका-यांनी सांगितले की, मिथेनॉल किंवा इथेनॉल पोटात गेल्यास डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आदी त्रास जाणवू शकतात. मिथेनॉल विषबाधामुळे पचनक्रिया बिघडणे, पोटात विष निर्माण होणे, अंधत्व आणि मृत्यू देखील होण्याची दाट शक्यता असल्याचेही अधिका-यांनी सांगितले.

एफडीएकडून होतेय कारवाई
अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने जूनमध्ये मेक्सिकोमध्ये उत्पादित करण्यात येत असलेल्या हॅण्ड सॅनिटायझर जेलबाबत इशारा दिला होता. या हॅण्ड सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणावर मिथेनॉल असल्याचेही म्हटले होते. मागील काही दिवसांपासून एफडीएकडून अशा उत्पादनांची यादी काढण्यात येत होती. एफडीएने मिथेनॉल असलेल्या अनेक हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनांची ओळख पटवलेली आहे. एफडीएच्या सूचनेनंतर आता विक्रेत्यांनी आणि वितरकांनी हॅण्ड सॅनिटायझर बाजारातून मागे घेतले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या