22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘मायक्रोसॉफ्ट’च्या १८०० कर्मचा-यांवर गंडांतर!

‘मायक्रोसॉफ्ट’च्या १८०० कर्मचा-यांवर गंडांतर!

एकमत ऑनलाईन

आर्थिक मंदीची भीती
न्यूयॉर्क : दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. याआधी जगातील अनेक मोठ्या कंपन्याही आर्थिक मंदीचे कारण देत आपले कर्मचारी कमी करत आहेत. सत्या नडेला संचालित मायक्रोसॉफ्ट ‘पुनर्रचने’चा भाग म्हणून कर्मचा-यांना काढून टाकणारी पहिली टेक कंपनी बनली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात आणि उत्पादन विभागातील १.८१ लाख कर्मचा-यांपैकी सुमारे १ टक्के, कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे १,८०० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने विंडोज, टीम्स आणि ऑफिस ग्रुप्समधील नोकरभरतीही कमी केली असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. तत्पूर्वी, ट्विटरने आपल्या भर्ती टीममध्ये ३० टक्के कपात केली आहे, तर एलोन मस्क संचालित टेस्ला देखील सतत शेकडो कर्मचा-यांना काढून टाकत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या