वॉशिंग्टन : कोव्हिड १९ वरच्या मॉडर्ना लसीला अमेरिकन सरकारने मान्यता दिली असून, आता मॉर्डना लस अमेरिकेत उपलब्ध झाली आहे़ या लसीला परवानगी मिळाल्याची घोषणा होण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन, मॉडर्ना लस आता उपलब्ध आहे, असे ट्विट केले आहे.
आठवडाभरापूर्वी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने फायझर – बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली होती. अमेरिकेने मॉडर्नाच्या लसीचे २० कोटी डोसेस विकत घेतले असून यापैकी ६० लाख डोसेस आता तयार आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण अमेरिकेतच सर्वाधिक झालेले असून मॉडर्नाच्या लसीलाही परवानगी मिळाल्याने आता अमेरिकेत कोव्हिड १९वरच्या दोन लसी उपलब्ध आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत कोव्हिडमुळे ३ लाख ११ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत़ तर एकूण १ कोटी ७२ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. लसीबद्दल बोलताना टेनेसी मेहरी मेडिकल कॉलेजचे सीईओ डॉ. जेम्स हिलड्रेथ यांनी म्हटले आहे, जानेवारीमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळल्यानंतर डिसेंबरमध्ये दोन लसी उपलब्ध होणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे. मॉडर्नाची लस सुरक्षित असून ९४% पर्यंत परिणामकारक असल्याचे म्हटले होते़
सोनियाजींच्या सूचनांचे स्वागतच – खा. संजय राऊत