नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे. द्विपक्षीय व्यापारासह विविध जागतिक मुद्यांवर त्यांनी चर्चा केल्याचे समजते.
यावेळी पुतीन यांच्या भारत दौ-यादरम्यान झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्यावरून जागतिक स्तरावर ज्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर मोदी-पुतीन यांच्यातील संवादही महत्त्वाचा मानला जात आहे.