31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमोदींनी निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला

मोदींनी निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सऍप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे, असे विधान खान यांनी केले आहे़

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्यांबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही दोघांमध्ये संवाद झालेला आहे. या संवादाबद्दल पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून भाष्य केलें आहे.

२०१९मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट मोदी सरकारने देशातील निवडणुकीसाठी बालाकोट संकटाचा वापर केला. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हे पत्रकार त्यांच्या तापटपणामुळे ओळखले जातात. या व्हॉट्सऍप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामतेकडे दुर्लक्ष करून निवडणूक ंिजकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केले. पाकिस्तानने बालाकोट संकट जबाबदारीने टाळले. तरीही मोदी सरकार भारताचं रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

‘ठाकूर-सुंदर’ जोडीची १२३ धावांची सर्वाेच्च भागीदारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या