नवी दिल्ली : जगातील ५० पेक्षा अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा धोका वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक पार पडली.
जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आपात्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत मंकीपॉक्स संदर्भात जागतिक आणीबाणीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
काही शास्त्रज्ञांच्या मते, केवळ पश्चिमेकडील देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाल्यामुळे मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा विचार करत आहे.