22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकुत्र्याला मंकीपॉक्सची लागण

कुत्र्याला मंकीपॉक्सची लागण

एकमत ऑनलाईन

पॅरीस : मंकीपॉक्स वायरस बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंकीपॉक्स वायरस प्रथमच प्राण्यांनमध्ये संक्रमित झाल्याची घटना घडली आहे. फ्रांसीसी रिसर्चर्स मध्ये एका कुर्त्याला मंकीपॉक्सची लागन झाल्याचे सिध्द झाले आहे. संशोधकांचा असा दावा आहे की हा विषाणू माणसापासून प्राण्यांच्यात पसरल्याची पहिलीच घटना असावी.

द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रकानुसार, पॅरिसमधील सोरबोन युनिव्हर्सिटीच्या टीमने पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणा-या दोन (गे) पुरुषांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे प्रकरण आढळला आहे. या लॅटिन पुरुषांपैकी एक ४४ वर्षांचा आहे आणि तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. दरम्यान, तो एचआयव्हीसाठी अँटीरेट्रोव्हायरल औषध घेतो त्याचा अनडिटेकटेबल वायरस आहे. आणखी एका माणूस एचआयव्ही-निगेटिव्ह आहे, आणि तो २७ वर्षांचा आहे. मंकीपॉक्सच्या लक्षणांची सुरूवातीनंतर १२ दिवसानंतर कुत्रा संक्रमीत आढळला. कुत्रा नर आहे आणि त्याचे वय ४ वर्षे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या