न्यूयॉर्क : कोरोना पाठोपाठ आता मंकीपॉक्सने जगाची धाकधूक वाढवली आहे. मंकीपॉक्सने जगातील अनेक देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. हा आजार झपाट्याने पसरत आहे. जगातील २० हून अधिक देशांमध्ये या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार, मंकीपॉक्सच्या सुमारे २०० रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १०० हून अधिक रुग्ण संशयित आहेत. जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
अमेरिकेने मंकीपॉक्सच्या ९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अमेरिके व्यतिरिक्त, ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये मंकीपॉक्सच्या ११८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युनायटेड किंग्डमने ९० रुग्णांची नोंद केली आहे. तर अमेरिकेत मंकीपॉक्सच्या ९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.