28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमीठाच्या अतिसेवनाने होतायेत अधिक मृत्यू

मीठाच्या अतिसेवनाने होतायेत अधिक मृत्यू

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : कोरोना महामारी सुरु झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)ने जगाला अनेक सल्ले आणि वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आताही डब्ल्यूएचओने कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मीठाचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जगभरात अनेक मृत्यू होत आहेत़ भारतातही मृत्यूंचे प्रमाण आता वाढते होत असून, यात अनेकांचा बळी हा उच्च रक्तदाबामुळे होत असल्याचे दिसूून येत आहे़ याचे कारण म्हणजे मीठ़ मिठाचे अतीसेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन हृदयावर परीणाम होतो आणि व्यक्ती दगावण्याचा प्रमाणही वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे़ दरम्यान, डब्ल्यूएचओने असे का म्हटले आहे? जाणून घ्या. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थ्यांत जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यामुळे लोकांमध्ये ह्रदयरोग आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्धभण्याच्या शक्यता आहेत.

सोडीयम क्लोराइड नावाचे एक रसायन असते. ज्यात सोडीयम नावाचे खनिज आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करते. शरीरात मीठाचे म्हणजेच सोडीयमचे प्रमाण वाढल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. प्रत्येक देशात खाल्ली जाणारी चपाती, भात, मांस त्याचप्रमाणे पनीर, दही या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणाच सोडीयमची मात्र असते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या जेवणातील मीठाचे सेवन कमी करण्यासाठी लोकांना आहाराचा योग्य पर्याय उलब्ध करुन देणे गरजेचे आहे. शरीरात खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थांमधून शरीरात योग्य प्रमाणात सोडीयम जाणे गरजेचे आहे.
३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे

शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो. जगभरात कोरोना व्यतिरिक्त होणारे मृत्यूमध्ये हृदयरोगामुळे होणा-या मृत्यूंची संख्या अधिक आहे. आतापर्यंत ३२ टक्के लोकांचा मृत्यू हा हृदयरोगामुळे झाला आहे. त्याचबरोबर शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढल्यास स्थूलता, किडणीचे आजार, गॅस्ट्रिक कॅन्सर यासांरखे आजार होतात.

५ ग्रॅमपेक्षा अधिक मीठ घातक
दरवर्षी जागतिक पातळीवर ११ लाख लोकांचा मृत्यू हा संतुलित आहार न केल्यामुळे होता व त्यातील ३ लाख लोकांचा मृत्यू हा मीठाचे अधिक सेवन केल्यामुळे होत आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दररोज जेवणात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन करा असा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.

इतर राज्यांकडे लक्ष द्या; केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या