वॉशिंग्टन: अमेरिकेतील कोरोनाचा कहर अक्षरक्ष: आवरता न येण्याजोगा झाला आहे.सध्या अमेरिकेत दररोज कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनाचे १ लाख ५७ हजार रुग्ण आढळून आले. तर १ हजार २६० जणांचा मृत्यू झाला.
जागतिक रुग्णसंख्येत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागत असून अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सध्याच्या घडीला दररोज ४० ते ४५ हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या यादीत ब्राझील तिस-या स्थानी आहे. ब्राझीलमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे २९ हजार ४६३ कोरोना रुग्ण सापडले. तर ७२७ कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले.
भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक
अमेरिकेत आत्तापर्यंत १ कोटी १२ लाख २६ हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी २ लाख ५१ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या ८८ लाखांहून अधिक आहे. यातील १ लाख २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५८ लाख ४८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक जणांनी जीव गमावला आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.
सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत भारत जगात तिसरा
अमेरिकेत आतापर्यंत ६८.९१ लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४० लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या ८८ लाखांपैकी ८२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी आहे. ब्राझीलमध्ये सध्या ४ लाखांपेक्षा कमी जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ५३ लाखांजवळ पोहोचली आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत देशाचा क्रमांक जगात तिसरा आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश चौथ्या स्थानी आहे.
अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन