25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयहिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट-WHO

हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट-WHO

एकमत ऑनलाईन

यूरोप : जगभरात कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये या आजारावरील लस शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चेतावणी दिली आहे की येणाऱ्या हिवाळ्यात यूरोपसह जगभरातील अनेक भागात कोरोनाची मोठी लाट येईल. संघटनेने म्हटले आहे की या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या वाढेल व मृत्यू दरात देखील वाढ होईल. यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग म्हणाले की, हिवाळ्यात तरुणांच्या तुलनेत वृद्धांना हा आजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आम्ही कोणतीही अनावश्यक भविष्यवाणी करत नाही आहोत. मात्र निश्चितच असे होण्याची शक्यता आहे.

यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग यांनी येणाऱ्या महिन्यात 3 मुख्य कारणांवर लक्ष देण्यास सांगितले आहे. यात शाळा पुन्हा सुरू करणे, हिवाळा आणि हिवाळ्यात होणाऱ्या वृद्धांच्या मृत्यूचा समावेश आहे. या कारणांमुळे संसर्ग अधिक घातक होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, जगभरातील देशांनी या चेतावणीनुसार आताच तयारी सुरू करायला हवी. अमेरिकेत शाळा आणि कॉलेज सुरू केल्याने अनेक ठिकाणी संसर्ग पसरल्याचे समोर आले आहे.

डबल्यूएचओने सांगितले की, त्यांनी एक कमेटी बनवली आहे. जी आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यासंदर्भातील नियम तयार करेल. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संघटनेने ठोस पावले न उचलल्याची टीका जगभरातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 जणांना COVID-19 ची लागण तर मृतांचा आकडा 8,41,331 वर

  • जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे. Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटींच्या पार गेली असून आतापर्यंत एकूण 8,41,331 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर 1,72,99,915 रुग्ण बरे झाले असून त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. जगभराचा विचार केला असता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (US) असून देशात 60,96,235 रुग्ण आढळले आहेत.
  • Worldometers दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 1 लाख 85 हजार 901 रुग्ण दगावले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 33,75,838 वर पोहोचली आहे. अमेरिकेपाठोपाठ (USA) ब्राझील (Brazil) आणि भारत (India) देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
  • जगभरातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
  • सध्या देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु आहे. लवकरच अनलॉक 4 ला सुरुवात होईल. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात नेमक्या कोणत्या सेवा सुरु होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाच्या लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • दरम्यान कोरोना व्हायरसच्या  संकट काळात प्रवासी मास्क न घालता कोविड-19च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांची नो-फ्लाय लिस्ट बनवण्याची सूचना नागरी उड्डाण महासंचालनालयाने सर्व एअरलाईन्सला दिल्या आहेत.

होम आयसोलेशनमध्ये कोरोनावर मात

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या