22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीय५० हजाराचा मेकअप करून मायलेकी फरार

५० हजाराचा मेकअप करून मायलेकी फरार

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्युटी पार्लरमधील मेकअपचे सुमारे ५० हजारांचे बील झाल्यावर एक महिला आणि तिच्या मुलीने पळ काढल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.

ब्युटी पार्लरच्या मालकिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने सोशल मिडीयावरही या घटनेची पोस्ट टाकली असून ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

पार्लरच्या मालकिनीचे नाव जेम्स एडम्स असे आहे. तीने पोलिस तक्रारीत म्हटले की, माझ्या ब्युटी पार्लरमध्ये दोन महिला आल्या होत्या. त्यांनी मायलेकी असल्याचे मला सांगितले.

त्या दोघींनी मेकअप बरोबर बोटोक्स ट्रीटमेंट आणि दुस-या महागड्या ट्रीटमेंट करवून घेतल्या. पण जेव्हा ४८ हजार ९४२ रूपये बील देण्याची वेळ आली तेव्हा त्या ब्युटी पार्लरमधून फरार झाल्याचे ब्युटी पार्लरच्या मालकीनीने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या