वॉशिंग्टन : टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर त्याचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये या घसरणीनंतर इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
ज्यानंतर त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. इलॉन मस्क यांची गेल्या एका वर्षात १८० अब्ज डॉलरने संपत्ती कमी झाली आहे. फोर्ब्स मासिकानुसार २०२१ मध्ये इलॉन मस्क यांची संपत्ती ३२० अब्ज डॉलर्स होती.