24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाक संसदेत गदारोळ

पाक संसदेत गदारोळ

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हीडीओ आणि फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून, खासदारांना शिव्या आणि मारामारीच्या घटनाही घडल्या आहेत. कनिष्ट सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा मान सन्मान न करता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या.

केवळ एकमेकांना शिव्या देऊन आणि आरडाओरड करुन समाधान झाले नाही म्हणून हे खासदार एकमेकांना मारण्याचाही प्रयत्न करत होते. पाकिस्तानी खासदारांनी एकमेकांना आया-बहिणींवरुन शिव्या दिल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला खासादारांसमोरच हा शिवीगाळ सुरु होता. पाकिस्तानी संसदेमध्ये महिला लोकप्रितिनिधींसमोरच खासदार एकमेकांबद्दल अपशब्दाचा वापर करताना दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले.

अंतर वाढवण्याला वैज्ञानिक आधार; वादानंतर एनटीएजीआय प्रमुखांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या