18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालिबानमध्ये असमाई मंदिरात सजला नवरात्रोत्सव

तालिबानमध्ये असमाई मंदिरात सजला नवरात्रोत्सव

एकमत ऑनलाईन

काबुल : तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानात पसरलेल्या भीतीचे वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे. याचे ताजे उदाहरण राजधानी काबूलमध्येच पाहायला मिळाले. इथे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काबुलमध्ये हिंदू नागरिकांनी कीर्तन आणि जागरण केले. अफगाणिस्तानात सध्या तालिबानचे राज्य आले आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथे कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात हा कार्यक्रम करण्यात आला.

दरम्यान, अशरफ गनी सरकारमध्ये इथे सर्वकाही करण्यावर सूट होती. अमेरिकन सैन्य होते, तोपर्यंत अल्पसंख्याक समुदायही अतिशय गुण्यागोविंदाने इथे राहात होता. अफगाणिस्तानात हिंदू आणि शिख अल्पसंख्यांक आहेत. मात्र, १५ ऑगस्टला जसे तालिबानने काबुलवर चढाई केली. गनी देश सोडून पळाले, तसे इथल्या अल्पसंख्यांक समुदायाचे दिवसही पालटले. मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंवरही आता बंधने घालण्यात आली आहे. मात्र, तरीही धर्मिक कार्यक्रम अजूनही सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या असमाई मंदिरात किर्तन, जागरणाचे आयोजन करण्यात आले.

किर्तन जागरण आणि भंडाराही झाला
अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त काबुलच्या असमाई मंदिरात किर्तन, जागरण तर झालेच, शिवाय भंडा-याचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यात गरीब लोकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमात दीडशेच्या वर लोक जमले होते. ज्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिक होते. तालिबानकडून या कार्यक्रमात कुठलाही व्यत्यय आला नाही.

भारत सरकारकडे हिंदू-शिख समुदायाची मागणी
सध्या अफगाणिस्तानातील वातावरण हे दुषित झाले आहे, बहुसंख्याक असलेले अफगाण नागरिकच इथे भीतीत जगत आहेत, ना नोकरी, ना अन्नधान्य अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने या नागरिकांची लवकरात लवकर अफगाणिस्तानातून सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे. काबूलमधील हे असमाई मंदिर कर्ते परवन गुरुद्वारापासून ५ किमीच्या अंतरावर आहे. गेल्या आठवड्यात याच गुरुद्वारात संशयित तालिबानींनी तोडफोड केली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या