नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक नववनीन गोष्टी व्हायरल होत असतात. अशातच पाकिस्तानातील एका मुलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पाकिस्तानी मुलीची मान ९० डिग्री वाकलेली होती. त्यामुळे तिचे आयुष्य पुर्णपणे विस्कटलेले होते मात्र भारतीय डॉक्टर कृष्णन यांनी तिला नवजीवन दिले.
या मुलीचे नाव अफÞशीन आहे. अफÞशीनची मान लहानपणी एका अपघातात ९० डिग्री वाकली आणि तेव्हापासून ती तशीच होती. यामुळे ती शाळेत जाऊ शकत नव्हती आणि खेळू पण शकत नव्हती. भारतीय डॉक्टर कृष्णन यांनी अफÞशीनवर मोफत शस्त्रक्रिया करत तिला नवे आयुष्य दिले. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांनी अफÞशीनच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली.
अफÞशीन पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते. फक्त १० महिन्याची असताना एका अपघातात तीची मान ९० डिग्री वाकली गेली. अफशीनचे आई वडिल तिच्या या उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे गेले पण काहीही फायदा झाला नाही. वाढत्या वयासोबत अफÞशीनच्या वाकलेल्या मानेचा त्रासही वाढत होता. यात तिच्या आईवडिलांकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. १२ वर्षापासून अफÞशीन हे दु:ख सहन करत होती.
ती शाळेत जाऊ शकत नव्हती, ती खेळू शकत नव्हती एवढंच काय तर तिला खाणे, पिणे, बोलणे तसेच नीट चालताही येत नव्हते. तिला सेरेब्रल पाल्सीचा त्रास व्हायला लागला. सेरेब्रल पाल्सीमुळे शरीराची हालचाल, पोश्चर आणि संतुलन बिघडते. ब्रिटिश पत्रकार अलेक्जेंड्रिया थॉमस यांनी अफÞशीनची कहाणी प्रकाशित केली आणि कुटुंबाला डॉ. कृष्णन यांच्याशी संपर्क करुन दिला, डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांनी अफÞशीनवर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया केली.