नेपाळ संसदेची वादग्रस्­त नकाशाला मंजूरी

- तणाव वाढला - कोरोनावरून भारतावर आरोप

399

काठमांडू : गेल्­या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून, लिपुलेख, कालापानी आणि लिल्­पियाधुरा समवेत भारताच्या ३९५ कि.मी क्षेत्राला नेपाळने आपल्­या नकाशामध्ये दाखवले आहे. कायदा, न्याय आणि संसदीय प्रकरणांचे मंत्री शिवमाया थुम्­भांगफे यांनी देशाच्या या नकाशामध्ये बदलासाठी संविधान संशोधन विधेयकावर चर्चा करण्यासाठी सादर केले होते.

येथील संसदेत विधेयकावर चर्चा केल्यानंतर त्याला आज दि़ १० जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे़ यावर येथील राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे अजून बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे़ हे संविधान संशोधन विधेयक आता राष्­ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे अनुमोदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्­यांची स्­वाक्षरी झाल्­यानंतरच नवीन नकाशा कायद्याचा रूप घेईल. नेपाळच्या संसदेमध्ये मंगळवारी रात्री उशीरापर्यंत चर्चा करण्यात आली. त्­यातच नेपाळचे परराष्­ट्रमंत्री प्रद्रीप कुमार ग्­यावली यांनी भारतासोबत पुन्हा एकदा चर्चा करण्याची विनंती केली आहे.

Read More  नीरव मोदी आणि चोकसीचा 1,350 कोटींचा खजिना हाँगकाँगहून भारतात

नेपाळमध्ये ८५ टक्­के कोरोना भारतामुळे
नेपाळने आता कोरोना विषाणुवरून भारताला जबाबदार धरण्यास सुरूवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नेपाळमधील ८५ टक्­के कोरोनाची प्रकरणे भारतातून आल्­याचा आरोप केला आहे. या आधीही ओली यांनी भारतावर आरोप करताना म्­हटले होते की, नेपाळला जेवढा धोका इटली आणि चीनमधून आलेल्­या कोरोनाच्या प्रकरणांचा नाही, तितका धोका भारतातून आलेल्­या लोकांचा आहे. नेपाळमध्ये कोरोना विषाणुच्या एकुण रूग्­णांची संख्या ४ हजार ८५ वर पोहोचली आहे. तर यामध्ये १५ लोकांचा मृत्­यू झाला आहे.

तपासणी न करता होतायेत लोक दाखल: आरोप
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी म्­हटले होते की, दक्षिण आशियातील दुसºया देशांच्या तुलनेत देशातील मृत्­यूदर कमी आहे. तसेच यावेळी त्­यांनी आरोप लावताना भारतातून अवैध मार्गाने अनेक लोक नेपाळमध्ये दाखल होत आहेत. योग्­यरीत्­या तपासणी न करता नेपाळमध्ये दाखल होणाºयांमुळे नेपाळमध्ये कोरोना विषाणुच्या रूग्­णांची संख्या वाढत आहे.