तीव्र असंतोष, निदर्शने सुरु
काठमांडू : पाकिस्तान, श्रीलंकेप्रमाणे नेपाळमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
शेर बहादूर देऊबा यांच्या सरकारच्या गैरकारभारामुळे विरोधी पक्षनेते के.पी.ओली शर्मा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांच्या भूमिकेला नेपाळच्या सत्ताधारी पक्ष नेपाळी काँग्रेसने देखील समर्थन देत पंतप्रधानांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
के. पी. शर्मा ओली यांनी देशातील आघाडी सरकारने विश्वास गमावला असून त्यांचे सत्तेत राहण देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. शेर बहादूर देऊबा यांच्या पक्षात देखील त्यांच्या कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. शेखर कोईराला यांनी संविधानात बदल करण्याच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.