27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळच्या बेपत्ता विमानाचा अपघात

नेपाळच्या बेपत्ता विमानाचा अपघात

एकमत ऑनलाईन

लुंबिनी : नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली असून नेपाळमधील मुस्टांग या ठिकाणी या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक त्या ठिकाणी पोहचले आहे. मात्र अद्यापही प्रवाशांची माहिती मिळाली नाही.
या विमानामध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते, त्यामधील चार प्रवासी हे भारतीय होते. ही माहिती मिळताच त्या ठिकाणी बचाव पथक रवाना झाले आहे. पण खराब हवामानामुळे या ठिकाणी पोहोचण्यास बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती आहे.

त्याआधी जोमसोम एअरपोर्टच्या ट्रॅफिक कंट्रोल विभागाने सांगितले होते की त्यांना एका मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकू आला. पण त्यांची त्यांना पृष्टी करता आली नव्हती. धमाका ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. ज्या ठिकाणी धमाका झाला त्याच ठिकाणी त्या विमानाचा शेवटी संपर्क तुटला होता. तारा एअरचे ९ एनएईटी डबल इंजिन विमानाने पोखरातून जॉमसमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण घेतले होते.

या विमानाचे सारथ्य कॅप्टन प्रभाकर घिमिरे करत होते. सुरुवातीला या विमानामध्ये १९ प्रवासी असल्याचे सांगितले जात होते. सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी या विमानाचे उड्डाण झाले होते. एनएईटी ट्वीन इंजिन असलेले हे विमान तारा एअरलाइन्स कंपनीचे होते. थोड्या वेळानंतर या विमानात एकूण २२ प्रवासी असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी
या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असे या चार भारतीय प्रवाशांची नावे आहेत.

मदत आणि बचाव कार्य सुरू
विमान कोसळल्याच्या शक्यतेने मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी विमाने पाठवली आहेत. त्याशिवाय नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टरदेखील शोधासाठी पाठवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या