25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेतान्याहू यांनी मानले समर्थक देशांचे आभार

नेतान्याहू यांनी मानले समर्थक देशांचे आभार

एकमत ऑनलाईन

जेरुसलमेम : इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी पॅलेस्टाईन इस्त्रायलच्या संघर्षामध्ये इस्रायलसोबत उभे राहिल्याबद्दल विविध देशांचे आभार मानले आहेत. नेतान्याहू यांनी साथ दिलेल्या देशांचे ध्वज ट्विट करत आभार मानले आहेत. मात्र यामध्ये भारतीय तिरंगा नसल्याने अनेक युजर्सने नेतान्याहू यांच्यावर टीका केली आहे.

शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्याची निंदा केली होती. यानंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला होता. इस्रायलने गाझा पट्टीत शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेचे कार्यालय असलेली एक इमारत पाडण्यात आली. या इमारतीत असोसिएटेड प्रेस व अल जझीरा यांच्यासह अनेक कार्यालये व घरे होती.

नेतान्याहू यांनी ट्वीटमध्ये इस्रायलचे समर्थन करणा-या सर्व देशांच्या ध्वज ठेवत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. दहशतवादी हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या बाजूने उभे राहून आणि स्वसंरक्षणाच्या अधिकारास पांिठबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

चेकपोस्टवरील आरटीपीसीआर चाचणी रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या