19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये सापडला नवा जी ४ स्वाईन फ्लू व्हायरस

चीनमध्ये सापडला नवा जी ४ स्वाईन फ्लू व्हायरस

- चीनमधील संशोधकांचा दावा - चिंतेत आणखी भर

एकमत ऑनलाईन

बीजिंग: सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तसेच, यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरसची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.

अमेरिकन सायन्स जर्नलमध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या एच१एन१ चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर, तो गंभीर रुप धारण करेल, असे चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असे नाव देण्यात आले आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत संशोधन केले. तसेच, यादरम्यान १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसेच, या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू

चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी ४ ला वेगळे करण्यात आले. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले़ त्यापैकी सर्वाधित डुकरांमध्ये जी ४ स्वाईन फ्लू असल्याचे दिसून आले. तसेच, तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये २०१६ पासून असल्याचेही समोर आले. यानंतर वैज्ञानिकांनी जी ४ वर संशोधन सुरू केला. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, जी ४ हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगाने आणि गंभीरतेने पसरू शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली. हा व्हायरस मानवी शरीरात अधिक तीव्रतेने पसरतो. तसेच, हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी ४ स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. सामान्य फ्लूपासून रक्षण होत असले तरी जी ४ गंभीर रुप धारण करु शकतो, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

चीनमध्ये संक्रमनास सुरूवात

डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाºया १० पैकी एका कामगारामध्ये जी ४ चा संसर्ग झाल्याचे दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. तसेच, वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी ४ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. २३० जणांच्या केल्या चाचणीत त्यापैकी ४.४ टक्के लोकांना याचे संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी तो एकाकडून दुस-या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे. जर हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे गेला तर, याचे परिणाम गंभीर होती. तसेच, ज्या लोकांचे काम डुकरांशी निगडित आहे, अशा लोकांना अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे चीनच्या वैज्ञानिकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Read More  कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने गळफास घेवून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या