21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनासाचे नवे संशोधन; वसू शकते मानवी वस्ती

नासाचे नवे संशोधन; वसू शकते मानवी वस्ती

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चंद्रावर असे काही गड्डे आहेत ज्यात मानव भविष्यात मानवी वस्ती वसवू शकतो. नासाच्या शास्त्रज्ञांनी ‘लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटल’च्या मदतीने याचा शोध लावला आहे. चंद्रावरील हे गड्डे पहिल्यांदा २००९ मध्ये पाहिल्या गेले होते. मात्र यावेळी या गड्ड्यांवरील तापमानाचा अंदाज घेतला असता यात भविष्यात मानवी वस्ती वसवता येऊ शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

यावेळी वैज्ञानिकांनी नव्याने केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले की, चंद्रावर असलेल्या या गड्ड्यांचे तापमान १७ डिग्रीच्या जवळपास आहे. हे वातावरण मानवजातीसाठी अनुकूल आहे त्यामुळे इथे माववी वस्ती वसू शकते. नासा शास्त्रज्ञ नोआ पेट्रो म्हणाले चंद्रावर असणारे हे गड्डे चकीत करणारे आहेत. या गड्ड्यांधील तापमान सातत्याने स्थिर राहिले तर इथे मानवी वस्ती वसवली जाऊ शकते.

चंद्रावरील गड्डे ३२८ फूट खोल
चंद्रावर असलेल्या गड्ड्यांना ‘लूनार पिट्स’ असे म्हणतात. त्यांची खोली ३२८ फूट एवढी आहे. या गड्ड्यांचे तापमान सगळीकडून बदलत राहते. मात्र तापमानात फारसा फरक नसतो. नासाच्या टीमने चंद्राच्या एका भागाची लांबी मोजण्यासाठी कंप्युटर मॉडेलिंगचा वापर केला. तसेच नासाच्या म्हणण्यानुसार भविष्यात चंद्रावर असलेल्या गुहांमध्येही राहणे शक्य आहे. या गुहा लावा ट्यूबच्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या