39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeआंतरराष्ट्रीयन्यूयॉर्क विधानसभेत दिवाळी सुटीचा कायदा करण्याची तयारी

न्यूयॉर्क विधानसभेत दिवाळी सुटीचा कायदा करण्याची तयारी

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे तिथे दिवाळीची सरकारी सुटी घोषित करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात न्यूयॉर्कच्या विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यानंतर दिवाळीला सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रस्तावात दिवाळीसोबतच न्यूयॉर्कमध्ये लूनर न्यू ईयरला सरकारी सुटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

न्यूयॉर्क विधानसभेचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी बुधवारी एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, न्यूयॉर्कच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीला ओळखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. ते म्हणाले, ‘विधानसभेत लूनर न्यू ईयरला आणि दिवाळीला सुटी देण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी हा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. या निर्णयाचा शाळेच्या कॅलेंडरवर काय परिणाम होणार यावर चर्चा सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या