29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयन्यूझीलंडने भारतीयांच्या प्रवेशावर आणली बंदी

न्यूझीलंडने भारतीयांच्या प्रवेशावर आणली बंदी

एकमत ऑनलाईन

ऑकलंड : देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने पुन्हा एकदा अनेक देशांकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. न्यूझीलंडनच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ११ एप्रिलपासून साधारण दोन आठवड्यांसाठी भारतातून येणा-या सर्व यात्रेकरूंच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणली आहे, यासंदर्भातील घोषणा न्यूझीलंडनच्या पंतप्रधानांनी गुरूवार दि़ ८ एप्रिल रोजी केली. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे न्यूझीलंडच्या नागरिकांना देखील देशात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांच्या प्रवेशावर आणलेली ही बंदी ११ एप्रिल रविवारपासून सुरू करण्यात येणार असून ती २८ एप्रिलपर्यंत असणार आहे, असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेंिसडा अर्डर्न यांनी सांगितले. यासह कोरोनापासून सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या इतर देशांमध्ये होत असलेल्या कोरोनाचा धोका यावर देखील सरकार विचारविनिमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या