32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयन्यूझिलंड १०० दिवसांपासून कोरोनामुक्त

न्यूझिलंड १०० दिवसांपासून कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

वेलिंग्टन : जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. जगभरात २० कोटींच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सात लाख तीस हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक कोटी २७ लाख ३७ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गत १०० दिवसांपासून एकही कोरोनाबाधीत न आढळलेला न्यूझिलंड या देशाने बाजी मारली आहे़ न्यूझिलंड गत चार महिन्यांपासून कोरोनामुक्त झाला असून, या दरम्यानच्या काळात येथे एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने जगातील एकमेव सुरक्षित असलेला देश बनला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप तसाच आहे. याउलट अनलॉक होताना देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भारतासोबतच लॉकडाउन करणा-या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जगातील इतर देशांपुढे न्यूझीलंडने आज एक आदर्श ठेवला आहे.

शेजारील देशामुळे धोक्याची शक्यता
न्यूझीलंडने यशस्वीपणे कोरोनाविरोधात लढा दिला आहे. पण न्यूझीलंडजवळ असलेल्या व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा फटका न्यूझीलंडला बसण्याची शक्यता आहे. ५० लाख लोकसंख्या असणा-या न्यूझीलंडने कोरोनावर यशस्वी मात करत जगाला आदर्श दाखवून दिला आहे.

सद्यपरिस्थित जगातील सर्वात सुरक्षित देश
न्यूझीलंड सध्या जगातील सर्वात सुरक्षित देश आहे. न्यूझीलंडमधील नागरिक सध्या सर्वसामान्य जीवन जगत आहे. पण, चिंतेची बाब म्हणजे येथील लोक सध्या चाचणी करण्यास नकार देत आहेत. तसेच कोविड संदर्भातील सरकारी ऍप्सचा वापरही करत नाही. यात भर म्हणून मुलभूत स्वच्छतेच्या नियमांची पायामल्लीही करत आहेत. यामुळे न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी मागील १०० दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही.

भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरीतला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या