22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप नको

भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप नको

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे़ कॅनडाने नेहमीच शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे़ आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली, असे ट्विट ट्रुडो यांनी केले होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्रुडो यांच्या टिप्पणीवर मीडियाने केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. आम्ही भारतीय शेतक-यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली, परंतु ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत. विशेषकरून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूने चुकीच्या पद्धतीने समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल, असे प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिले आहे़ दुसरीकडे, भाजपचे वजनदार नेते राम माधव यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. भारताच्या अंतर्गत मुद्यावर टिप्पणीच्या अधिकारासंबंधी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ट्रुडो कोण आहेत? हे भारताच्या सार्वभौम मुद्यांत हस्तक्षेप करण्यासारखे नाही का? असें ट्विट राम माधव यांनी केले आहे़

कोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचा सिरमकडून पुनरुच्चार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या