22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनोबेल पारितोषिक विजेत्या ‘आंग सान सू कीं’ना ५ वर्षांचा तुरुंगवास

नोबेल पारितोषिक विजेत्या ‘आंग सान सू कीं’ना ५ वर्षांचा तुरुंगवास

एकमत ऑनलाईन

म्यानमार : म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांना तेथील न्यायालयाने ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे मिलिट्री न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. ७६ वर्षीय सान सू की यांना तब्बल ६ लाख डॉलर कॅश आणि सोनं लाच घेतल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आहे. सू की यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची एकूण ११ प्रकरणे आहेत.

सू की यांना यापूर्वी भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्कराविरुद्ध असंतोष भडकवल्याबद्दल आणि कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. म्यानमारमध्ये १ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री लष्कराने सू की यांना सत्तापालट करून अटक केली होती. १ फेब्रुवारी रोजी लष्कराने देशात प्रवेश केल्यापासून ७६ वर्षीय सू की लष्कराच्या ताब्यात आहेत.

गतवर्षी त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सू की यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या वृत्ताला एका विधि अधिका-याने दुजोरा दिला आहे. राजधानी नेपूता येथे एका बंद खोलीत सू की यांच्यावरील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या