वॉशिंग्टन : भारतासह जगभरात दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जात. मागील वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. आता दिवाळीची लोकप्रियता पाहून, युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळीला राष्ट्रीय सुटी घोषित केली आहे. सिनेटर निकिल सावल यांनी बुधवार दि. २६ एप्रिल रोजी ट्वीट करुन ही माहिती दिली.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सिनेटने दिवाळीला अधिकृत सुटी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केले. प्रकाशाचा हा सण साजरा करर्णाया सर्व पेनसिल्व्हेनियन लोकांचे अभिनंदन, तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहात. हे विधेयक सादर करण्यात मला सहभाही होण्याची संधी दिल्याबद्दल ग्रेग रॉथमन यांचे धन्यवाद.
विधेयकावर एकमताने मतदान
पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर ग्रेग रॉथमन आणि सिनेटर निकिल सावल यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला अधिकृत सुटी जाहीर करण्यासाठीचे विधेयक मांडले होते. ज्यावर एकमताने मतदान झाले आणि दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली.
पेनसिल्व्हेनियामध्ये उत्साह
पेनसिल्व्हेनियामध्ये अंदाजे २००,००० दक्षिण आशियाई रहिवासी राहतात, त्यापैकी मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करतात. हजारो पेनसिल्व्हेनियन लोक दरवर्षी दिवाळी साजरी करतात. मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि समुदाय केंद्रांमध्ये दिवाळीची पूजा केली जाते.
सांस्कृतिक विविधता जपली
आजचा दिवस आनंदाचा आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला मान्यता देण्याचा कायदा सिनेटने नुकताच ५०-० ने पास केला. दिवाळीला अधिकृत सुटी जाहीर केल्याने आपल्या राष्ट्रकुलाची समृद्ध सांस्कृतिक विविधता जपली आहे असे ग्रेग रॉथमन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्येही सेलिब्रेशन
अमेरिकेत दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. व्हाईट हाऊसमध्येही तो साजरा केला जातो. गेल्या वर्षी, जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन नी २४ ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दिवाळीचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षांनी दिवाळीचे प्रतीक म्हणून दीपप्रज्वलनही केले होते.