37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयआता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम

आता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नूतन अध्यक्ष ज्यो बायडन यांनी त्यांच्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर ५५ पेक्षा अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांची नेमणूक केली आहे. अशातच त्यांनी नासाच्या शास्त्रज्ञांसमोर बोलताना एक महत्त्वाचे विधान केले आहे. सध्या अमेरिकेचा लगाम भारतीयांच्या हाती आहे, असे म्हणून त्यांनी भारतीयांचे महत्त्वच जणू अधोरेखित केले आहे.

बायडन यांनी मंगळावर पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या ऐतिहासिक लॅण्डींगसंदर्भात नुकतीच नासाच्या संशोधकांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नासाच्या मंगळ मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या भारतीय वंशाच्या संशोधक स्वाती मोहनसुद्धा सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या हाती अमेरिकाचा लगाम आहे. तुम्ही (स्वाती मोहन), माझ्या उपराष्ट्राध्यक्ष (कमला हॅरिस), माझे भाषण लिहीणारे (विनय रेड्डी), अशी यादीच वाचून दाखवली, असे म्हटल्याची माहिती स्वाती मोहन यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या ५५ लोकांच्या यादीमध्ये उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि नीरा टंडन यांचा समावेश नाही. अन्यथा ही यादी आणखी मोठी असली असती.

अमेरिकेत भारतीयांचा वाढता बोलबाला
अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्येही अनेक भारतीय अमेरिकन नागरिकांना प्रशासनामध्ये सहभागी करुन घेतले होेते. मात्र ओबामा प्रशासनापेक्षा बायडन यांनी अधिक भारतीयांची नियुक्ती केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आणि कॅबिनेट दर्जाच्या पदांवर भारतीय अमेरिकन नागरिकांना नियुक्त केले होते.

इंधन दरवाढ अटळ ? आखाती देशांची आडमुठी भूमिका कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या