26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतेल कंपन्यांनी उकळला, १०० अब्ज डॉलर नफा!

तेल कंपन्यांनी उकळला, १०० अब्ज डॉलर नफा!

एकमत ऑनलाईन

यूयॉर्क : जगावर ऊर्जा संकट आले असतानाही गरीब देशांना अडचणीत आणून विक्रमी नफा कमाविणा-या तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या हावरटपणावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी तीव्र टीका केली.

सारे जग अडचणीत असताना त्याचा फायदा उठवून तेल कंपन्यांनी पहिल्या तिमाहीतच एकत्रितपणे १०० अब्ज डॉलर नफा उकळला असून हे अनैतिक आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे. जागतिक संकटाबाबतच्या प्रतिसाद गटाने तयार केलेला अहवाल गुटेरेस यांनी आज प्रसिद्ध केला.

यावेळी गुटेरेस म्हणाले की,‘कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या आणि युक्रेन युद्धाचाही फटका बसलेले देश सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अन्न, ऊर्जा आणि पैसा या एकमेकांशी संबंध असलेल्या तीन संकटांचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत तेल कंपन्यांनी अडचणीचा फायदा उठवून प्रचंड नफा कमाविला.’

संयुक्त राष्ट्रांकडून आवाहन
श्रीमंत देशांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे, वाहतुकीचे पर्यावरणपूरक पर्याय शोधावेत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहतुकीच्या साधनांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हावा, ऊर्जा तंत्रज्ञानासाठीच्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी सक्षम करावी. प्रत्येक देशाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. तरीही, प्रत्येकाचे लक्ष दुसरा काय करतो, याकडेच आहे. अनेक विकसनशील देशांना वादळे, वणवे, पूर आणि दुष्काळांचा फटका बसत आहे. ते शाश्­वत ऊर्जेसाठी गुंतवणूक करू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या