22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeआंतरराष्ट्रीयओला-उबेर विलीनीकरण होणार?

ओला-उबेर विलीनीकरण होणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील प्रसिध्द कॅब सर्व्हिस कंपनी ओला आणि उबेर टेक्नॉलॉजीज यांच्या विलीनीकरणासंबंधी बातम्या समोर येत आहेत. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी विलीनीकरणासंदर्भात सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे उबेरच्या उच्च अधिका-यांची भेट घेतली. मात्र, आता ओलाचे भाविश अग्रवाल यांनी याला ‘बकवास’ असल्याचे म्हटले आहे.

ओलाचे कार्यकारी अधिकारी भाविश आग्रवाल यांनी ट्वीट करत या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विलीनीकरणाशी संबंधित बातम्या शेअर करताना त्यांनी लिहिले की, पूर्णपणे बकवास.आम्ही खूप नफ्यात आहोत आणि चांगली वाढ नोंदवत आहोत. इतर काही कंपन्या भारतातून त्यांचा व्यवसाय सोडू इच्छित असल्यास त्यांचे स्वागत आहे! आम्ही कधीही विलीन होणार नाही. महत्वाचे म्हणजे ओला आणि उबेर या दोन कंपन्या भारतात सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत.

नेमके काय घडले होते?
गेल्या महिन्यात, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की उबेर टेक्नॉलॉजीज भारतातून आपला व्यवसाय बंद करत आहे. मात्र, उबेर इंडियाने हे वृत्त फेटाळून लावले. भारतातून व्यवसाय बंद करण्याचा विचारही करू शकत नाही, असे उबेरकडून सांगण्यात आले. उबेरच्या दृष्टीने भारत आणि जपान ही आशियातील सर्वाधिक वाढणारी बाजारपेठ आहे.

सॅन फ्रान्सिस्को-बेस्ड कंपनी उबेरने २०१३ मध्ये भारतात सेवा सुरू केली आणि आता ती देशभरातील जवळपास १०० शहरांमध्ये कॅब उपलब्ध करून देत आहे. त्याच वेळी, ओलाबद्दल बोलताना, भारतात व्यवसाय विस्तारत आहे. ओला आपल्या इनिशिअल पब्लिक ऑफरींगची तयारी करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयपीओ येऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या