22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकृष्णविवरातून येतोय् ‘ॐ’कार नाद!

कृष्णविवरातून येतोय् ‘ॐ’कार नाद!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था नासा अनेकदा पृथ्वी आणि अंतराळाशी संबंधित माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. आता नासाने ब्लॅकहोल म्हणजेच कृष्णविवरामधून येणा-या आवाजाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. अंतराळातील ब्लॅक होलचा भीतीदायक आवाज तुमच्याही काळजाचा ठोका चुकवेल.

नासाने २० कोटी प्रकाशवर्ष दूर असलेल्या ब्लॅक होलचा आवाज नासाच्या एका सॅटेलाइटने रेकॉर्ड केला आहे. मानवाला हा आवाज ऐकवण्यासाठी या आवाजाला ध्वनी तरंगात बदलण्यात आले आहे. मशीनच्या मदतीने त्या तरंगात नवीन नॉट्स जोडले गेले. नासाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे रेकॉर्डिंग शेअर केले आहे.

अंतराळात कोणताही ध्वनी नाही ही धारणा चुकीची आहे, असे नासाने म्हटले आहे. अंतराळ ही भलीमोठी पोकळी आहे. पण आकाशगंगेची गोष्ट वेगळी आहे. आकाशगंगेत मुबलक प्रमाणात गॅस असतो. जो हजार आकाशगंगांना आपल्यात सामावून घेऊ शकतो. नासाने आता रेकॉर्ड केलेला आवाज ज्या ब्लॅक होलचा आहे. तो पृथ्वीपासून २० कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा १.१ कोटी प्रकाश वर्ष पसरलेल्या पर्सियस आकाशगंगेचा भाग आहे.

ब्लॅक होलमधून ‘ओम’चा आवाज
नासाने शेअर केलेल्या ब्लॅक होलचा आवाज आत्तापर्यंत अनेकांनी ऐकला आहे. अनेकांनी नासाचा हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. तर, काहींना अंतराळात ॐचा आवाज घुमतो, असे लिहले आहे.

ब्लॅक होल म्हणजे काय?
खगोलशास्त्रातील सर्वांत रहस्यमय गोष्ट म्हणजे कृष्णविवर. आपण आकाशात शेकडो तारे पाहतो. हे तारे चिरंजीवी आहेत का? नाही. त्यांचेही जीवनचक्र आहे. बरेचसे मानवासारखे. एक मोठा फरक म्हणजे ता-यांचे आयुष्य हे काही कोटी किंवा काही अब्ज वर्षांचे असते. काय होते ता-यांचे मृत्यूनंतर? त्याच्या चार शक्यता असतात. त्यातील एक शक्यता म्हणजे कृष्णविवराची निर्मिती. त्याचे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते, की आसपासच्या वस्तूंना तर ते खेचून घेतेच; पण त्यामधून बाहेर पडू पाहणा-या प्रकाशालाही ओढून घेते. साहजिकच कृष्णविवरातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ते काळे दिसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या