27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeआंतरराष्ट्रीयएक गोवर रुग्ण १८ जणांना करू शकतो संक्रमित

एक गोवर रुग्ण १८ जणांना करू शकतो संक्रमित

एकमत ऑनलाईन

जीनेव्हा : कोरोनाचे संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सध्या जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसची लस घेण्याच्या प्रक्रियेत जग इतके व्यस्त झाले की जगभरातील मुलांच्या लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे.

अनेक देशांच्या लसीकरण कार्यक्रमाची पायाभूत सुविधा कोविड लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात व्यस्त होती. त्यामुळे आता गोवरने पुन्हा एकदा डोके वर काढले असून धोका वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील ४ कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास २.५ कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही, तर १.५ कोटी मुलांना दुसरा डोस मिळू शकलेला नाही. २०२१ मध्ये गोवरची सुमारे ९० लाख प्रकरणे नोंदवली गेली आणि १ लाख २८ हजार मृत्यूची नोंद झाली.

२२ देशांमध्ये संक्रमण
जगभरातील २२ देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून प्रथम कोरोना व्हायरसच्या लसीकरणामुळे गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि यंदा जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला. अलीकडे गोवरचा उद्रेक लाखो जीव धोक्यात आणत आहे. डब्ल्यूएचओने एका प्रकरणामुळे १२ ते १८ जणांना या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. ही परिस्थिती बिकट होत असल्याने यूएन आरोग्य संस्थेने निदर्शनास आणले आहे.

लसीकरण मोहीम रुळावर आणणे गरजेचे
गेल्या वर्षीही विषाणूचा रोग तितकाच तीव्र होता. कोविड-१९ विरुद्धच्या लसी विक्रमी वेळेत विकसित केल्या गेल्या, पण लाखो मुले प्राणघातक रोगांविरुद्ध जीवनरक्षक लसीकरणापासून वंचित राहिली. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस म्हणाले, लसीकरण मोहीम पुन्हा रुळावर आणणे अत्यंत आवश्यक आहे. या अहवालातील प्रत्येक आकडेवारीच्या मागे एक प्रतिबंधित रोगाचा धोका आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या