20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home आंतरराष्ट्रीय भारत, मोदींचा विरोध हा पाकिस्तानमधील सर्वात आवडता

भारत, मोदींचा विरोध हा पाकिस्तानमधील सर्वात आवडता

विषय इम्रान खान यांच्या निकटवर्तीय मंत्र्याचे वक्तव्य ; राजकारण्यांचे पोट त्यावरच भरते

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकारण हे भारताला विरोध करण्याच्या अवतीभोवतीच फिरते, अशी स्पष्ट कबुलीच इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्र्यानेच दिली आहे. इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणा-या फिरदौस आशिक अवान यांनी ही कबुली दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भावनांवर केलेल्या भाष्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. भारताला विरोध करण्यावरच आमची गुजराण होते. त्यामुळेच सर्व राजकीय नेते भारतावर टीका करण्यावर जोर देत असतात, असे अवान म्हणतात.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विषयाच्या विशेष सहाय्यक असणा-या अवान या पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेस त्यांना एका अँकरने आपल्याकडील राजकारण्यांनी भारत, मोदीसारख्या विषयांबद्दलची वक्तव्य करणे हे अगदी सामान्य झाले आहे असे वाटत नाही का?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अवान यांनी, आपल्या देशामध्ये भारतविरोधी भावनांसंदर्भातील वक्तव्य जास्त विकली जातात . जे सर्वाधिक चर्चेत असते, विकले जाते, लोक त्याचाच वापर करतात. हे केवळ सरकारच नाही तर सगळेच करतात, असे उत्तर दिले. विरोधी पक्षाने तर मोदींच्या नावाखाली तर अशा गोष्टी विकल्या आहेत की त्या ऐकून हसू येईल असा टोलाही अवान यांनी लगावला.

अवान या पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सत्तेत येण्याआधी इम्रान यांच्याच मुव्हमेंट फॉर चेंज मोहिमेत सक्रिय होत्या. याच मोहिमेदरम्यान इम्रान आणि त्यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये महिनाभर आंदोलन केले होते. अवान या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारमध्ये मंत्रीही होत्या. एप्रिल २०१९ मध्ये इम्रान खान यांनी अवान यांना आपल्या मंत्रीमंडळामध्ये सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयामध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले.

इम्रानखान हेच उत्तम उदाहरण
अवान यांच्या वक्तव्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे पंतप्रधान इम्रान खान. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सुद्धा वारंवार हे भारताविरोधात वक्तव्य करत असतात.

ओटीटी, डिजीटल माध्यमांवर आता केंद्राचा अंकुश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या