26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत उद्रेक

श्रीलंकेत उद्रेक

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेतील अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने त्रस्त असलेल्या जनतेने आक्रमक पवित्रा घेत आज लाखो आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवन गाठले आणि आज राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा मिळविला. मोठ्या संख्येने आंदोलक निवासस्थानी पोहोचल्याने राष्ट्रपतींनी निवासस्थान सोडून पळ काढला. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रपती निवासस्थानाची तोडफोड केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत झालेल्या झटापटीत १०० लोक जखमी झाले. राष्ट्रपती पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे विक्रमसिंघे यांनी तातडीने राजीनामा दिला.

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांच्या घरी झालेल्या बैठकीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर गोतबाया राजपक्षे आणि रानिल विक्रमसिंघे राजीनामा देण्यास तयार झाले. यावर महिंदा यापा अभयवर्धने अंतिम निर्णय घेणार आहेत. अखेर रानिल विक्रसिंघे यांनी राजीनामा दिला. या अगोदर ११ मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षेही संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. आता राष्ट्रपतीही पळून गेले आहेत.

श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासस्थानी आज सकाळी मोठ्या संख्येने आंदोलक घुसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोतबाया राजपक्षे यांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. राजपक्षेंना काल निवासस्थान सोडून एका अज्ञात ठिकाणी पोहोचवण्यात आले होते. सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांसोबत चर्चा केली, तर सर्वपक्षीय बैठकीत जो निर्णय होईल, तो मान्य असल्याची भूमिका गोतबाया राजपक्षे यांनी घेतली.

राष्ट्रपती निवासस्थानावर संतप्त आंदोलकांचा ताबा
श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. या परिस्थितीने त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे आपले निवासस्थान सोडून पळून गेले आहेत. संरक्षण सुत्रांनी राष्ट्रपतींनी पलायन केल्याचा दावा केला आहे. राष्ट्रपतींच्या निवासस्थानासह आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या